
वाळूज महानगर, (ता.12) – रांजणगाव (शे. पु.) येथील श्री. गजानन विद्यामंदिर आणि बसवंतराव पाटील प्राथमिक व माध्यमिक इंग्लिश स्कूल च्या संयुक्त विद्यामाने शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी आनंदाने शाळेत हजेरी लावली. यावेळी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करुन व गुलाब पुष्प देऊन उत्साहाने स्वागत केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष आय. जी. जाधव, श्री. गजानन विद्यामंदिर यांच्या मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, संस्थेचे सचिव हरीष जाधव, बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापिका रेखा बिदरकर उपस्थित होते. शाळेचा परिसर विद्यार्थ्यांच्या आनंदाने आणि उत्साहाने गजबजून गेला. नवीन वर्ग, नवीन पुस्तके आणि नव्या उत्साहासह विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी सोनी कुमारी, प्रतिभा मुंढे, कल्पना निकाळजे, सुरेखा शिंदे, अस्मिता तायडे, तेजेराव तलवारे, लता वैष्णव, महेश्वरी भातेवाले, अंकिता कुरे , अंकिता कुमारी, पूजा गिरी, दीपक पठारे, गुलाब मोहिते, परमेश्वर गीते आदी शिक्षकांची उपस्थिती होती.
