
वाळूज महानगर – वाळुज परिसरातील आदर्श पाटोदा गावात श्रीराम भक्त शिरोमणी हनुमान मंदीराच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त व विजयदशमी (दसरा) शुभमुहूर्तावर ह.भ.प. संत चरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर महाराज यांचे जाहीर हरी किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
हनुमान मंदीर आदर्श गांव पाटोदा येथे मंगळवारी 20 ऑक्टोबर रोजी संकाळी 9 ते 11 या वेळेत होणाऱ्या या कीर्तन सोहळ्यात गायनाचार्य ह भ प संगीत अंलकार प्रकाश म. कालकडे, ह भ प संगीत अलंकार किशोर महाराज शेळके, मृदंगाचार्य हभप गिरजीनाथ महाराज जाधव हे साथ देणार आहे. कीर्तनानंतर दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत महाप्रसाद होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याची विनंती गावकरी मंडळी आदर्श गांव पाटोदा व गंगापुर (ने.), पाटोदावाडी यांनी केली आहे.
