October 2, 2026

वाळूज महानगर – गोवंशीय जनावराची अवैध कत्तल करुन त्याचे गोमांस विनापरवाना ताब्यात बाळगुन बेकायदेशीर विक्री करताना गोरक्षकांनी पकडून दिल्याने पोलिसांनी मुद्देमालासह 21 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी दोन ऑक्टोबर रोजी जिकठाण येथे सकाळी करण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जिकठाण गावात गोमांस विक्री होत आहे, आम्हाला पोलीस मदत हवी आहे. असा कॉल गोरक्षक आकाश तोगे यांनी केल्याने वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश जोगस, पोलीस शिपाई बजरंग धाडगे, गणेश लक्कस, पोलीस अंमलदार घोगरे आदींनी जिकठाण येथे शुक्रवारी 2 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास छापा टाकला असता, तेथे आरोपी हनिफ इस्माईल कुरेशी वय-52 वर्ष रा. 52 नंबर गल्ली मनमाड जि.नाशिक (ह.मु.गंगापुर ता. गंगापुर जि.छ. संभाजीनगर) व शर्रिफ सुलेमान कुरेशी रा.जुम्मा मस्जिदजवळ गंगापूर हे मांस ताब्यात बाळगुन त्याची बेकायदेशीर विक्री करताना मिळुन आले.

त्यापैकी शरीफ कुरेशी हा पोलीसांना पाहुन पळुन गेला. त्यानंतर पोलिसांनी पाहणी करून त्यांच्या ताब्यातील वेगवेगळ्या चार पिशव्यामध्ये ठेवलेले गोवंशीय जनावरांचे मांस, स्टील व लोखंडी वजन काटा, दोन किलो व एक किलो वजनाचे दोन माप, मांस कापण्याचे सत्तुर, कानस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस शिपाई बजरंग हरिभाऊ धाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम-1976 कलम 5,5(क), सहकलम 325 बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *