वाळूज महानगर, (ता.12) – ताबा सुटल्याने भरधाव जाणारा ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या लॉजमध्ये घुसला. वाळूज परिसरातून जाणाऱ्या धुळे–सोलापूर महामार्गावरील करोडी पुलाजवळ शुक्रवारी 12 जून रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात ट्रकमधील दोघांपैकी एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला. अपघातात ट्रक आणि लॉजचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती की, ट्रक (जीजे 04 ए एक्स -9799) हा लासूरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येत होता. ट्रकमध्ये सुमारे 32 टन वॉशिंग पावडरचा माल भरलेला होता. हा ट्रक करोडी पुलाजवळ येताच चालकाचा ताबा सुटला. आणि ट्रक थेट दामोधरण लॉजमध्ये घुसला.
या अपघातात चालक आणि त्याचा सहकारी असे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान जखमींपैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून दुसऱ्या जखमीवर उपचार सुरू आहेत. सुदैवाने, अपघाताच्या वेळी लॉजमध्ये कोणीही उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली. दरम्यान आत्ताच श्री मोठी गर्दी जमा झालेले वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, जखमींना मदत करण्यासाठी करोडीचे सरपंच देविदास गावंडे, दगडू चव्हाण, गौतम उबाळे आणि आकाश बोर्ड यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. घटनेची माहिती मिळताच वाळूज वाहतूक शाखेचे पोलीस आणि दौलताबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
