
वाळूज महानगर – भरधाव जाणारी कार आणि मालवाहतूक करणारे वाहन यांच्यात अपघात झाल्यानंतर कारचालकाने शिवीगाळ करत दोघांना चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना घाणेगाव फाट्यावर मंगळवारी 3 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रांजणगाव (शेणपुंजी) येथील किराणा दुकानदार अक्षय रविंद्र पापडीवाल व हमाल नितीन पंडीत असे दोघे घाणेगावकडून रांजणगाव (शेणपुंजी) कडे येत असताना घाणेगाव फाट्यावर त्यांचे लोडिंग वाहन (एम एच 20, जी झेड -373) व स्विफ्ट डिझायर कार (एमएच 20 डी एफ- 1077) यांच्यात अपघात झाला. मंगळवारी 3 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर कार चालकाने शिवीगाळ करत पापडीवाल व पंडित यांना चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
