
वाळुज महानगर – बिमाटा तर्फे मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल, नागसेन परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम हा उपक्रम शुक्रवारी 24 जुलै रोजी मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धन, हरित क्षेत्र वाढविणे आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देणे हा उपक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमात बिमाटाचे सदस्य, पदाधिकारी, हितचिंतक, तसेच स्वयंसेवक मोठया उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांच्या हस्ते विविध प्रजातींची रोपे लावण्यात येऊन त्यांना संरक्षक जाळी बसवण्यात आली. लावण्यात आलेल्या या रोपटंयांचे संगोपन आणि संरक्षण करण्याचा संकल्प करण्यात आला.
या उपक्रमासाठी वेळ, सहकार्य, आर्थिक सहाय्य तसेच रोपे देणाऱ्या सदस्य, देणगीदार, स्वयंसेवक आणि मान्यवरांचे बिमाटा तर्फे आभार मानण्यात आले. वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा उपक्रम नसून तो भविष्यासाठी पर्यावरण रक्षणाचा दीर्घकालीन संकल्प आहे. असे प्रतिपादन कार्यक्रमातील प्रमुख मान्यवर सुभाष मुदगडकर यांनी केले. बिमाटा भविष्यातही असे उपक्रम राबवत राहील. या उपक्रमा अंतर्गत नागरिकांना पर्यावरण संरक्षणात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमाला मिलिंद थोरात, नंदकिशोर रत्नपारखी, सुभाष मोरे, सुनील वावरे, सुभाष खोसरे, मच्छिंद्र ओव्हळ, चंद्रकांत दळवी, बाळासाहेब घाडगे व प्राचार्य धनेकुमार टिळक, थोरात आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
