July 29, 2026


वाळुज महानगर  – पानटपरी बंद करून घरी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी कडी कोंडा तोडून आतील विविध कंपनीचे सिगारेट व रोख रक्कम मिळून 2 लाख 33 हजार 700 रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. बजाजनगर येथील लोकमान्य चौकात झालेली ही चोरीची घटना रविवारी 26 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली.

या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती, गट नंबर 168 प्लॉट नंबर 47 सिडको महानगर 1 येथील अमोल बिबिषण काळे (वय 36) वर्षे) याची बजाजनगर येथील लोकमान्य चौकात पान टपरी आहे. नेहमीप्रमाणे अमोल काळे हा टपरी बंद करून घरी गेला असता अज्ञात चोरट्यांनी त्याच्या टपरीचा कडी कोंडा तोडून आतील 28 हजार 725 रुपये किमतीचे फोर स्क्वेअर सिगारेटचे 300 पाकीट, 86 हजार 540 रुपयाचे एम अॅडवान्स सिगारेटचे 400 पाकीट, 21 हजार 525 रुपयाचे फ्युज बैंड सिगारेटचे 100 पाकीट, 17 हजार 860 रुपये किमतीची शीप्ट बटन सिगारेटचे 100 पाकीट, 44 हजार 50 रुपयेचे क्लो मिक्स सिगारेटचे 200 पाकीट तसेच रोख 35 हजार रुपये मिळून 2 लाख 33 हजार 700 रुपये किमंतीचा ऐवज चोरून नेला. ही चोरीची घटना 26 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अरुण उगले करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *