September 25, 2026

दहेगाव (बंगला) येथील कुख्यात गुंड आरोपी योगेश मारुती जाधव याची वाढती गुन्हेगारी लक्षात घेता त्याच्या विरुद्ध MPDA Act 1981 चे कलम 3 (1) अन्वये स्थानबध्दतेचे आदेश जारी केले असून त्याची रवानगी चंद्रपूर जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दहेगाव (बंगला) येथील योगेश मारुती जाधव, (वय 32 वर्ष) गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी व धोकादायक कारवायांची गंभीर दखल घेवून पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी त्याच्या विरुध्द MPDA Act 1981 चे कलम 3 (1) अन्वये स्थानबध्दतेचे आदेश जारी केले आहे. योगेश मारुती जाधव याच्यावर पोलीस ठाणे वाळुज येथे घातक शस्राने इच्छापुर्वक जबर दुखापत करणे, घातक शस्त्राने इच्छापुर्वक दुखापत करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमानित करणे, धाकधडपशाही करणे इत्यादी गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यास गुन्हे करण्यापासून रोखण्यासाठी त्याच्या विरुध्द फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 107 आणि भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 129 (ग) अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती. परंतु त्याने पुन्हा चढत्या क्रमाने गुन्हे केलेले आहेत. त्यामुळे त्याच्या स्थानबध्दतेचे आदेश 22 सप्टेंबर 2026 रोजी तामील करुन त्यास चंद्रपूर जिल्हा कारागृह येथे स्थानबध्द केले आहे.

यांनी केली कार्यवाही –
ही कार्यवाही पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-1) पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त (छावणी) नरेंद्र पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाळुज पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे, पोउपनि. संभाजी गोरे, सतिश जोगस, पोलीस हवालदार पांडुरंग शेळके, पोलीस अंमलदार नितीन धुळे, राजु फुलकर, सुधाकर पाटील, प्रल्हाद गुव्हाडे, सुखदेव कोल्हे आदींनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *