
वाळूज महानगर – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर पश्चिम ग्रामीण विभागाची संघटनात्मक आढावा बैठक बजाजनगर येथील उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर यांच्या संपर्क कार्यालयात रविवारी (दि. 16) मोठया उत्साहात झाली. मुंबई येथील वरिष्ठ पदाधिकारी तथा छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे निरीक्षक दीपक शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवरील सद्यस्थितीचा आढावा घेऊन आगामी संघटनात्मक वाटचालीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर, पश्चिम विधानसभा प्रमुख प्रमोद ठेंगडे पाटील, तालुका संघटक बाळासाहेब कार्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेना शहरप्रमुख विशाल खंडागळे यांनी बैठकीचे प्रास्ताविक करून आभार मानले.
तसेच उपतालुकाप्रमुख संतोष चंदन, सुदाम भंडे, बिबन सय्यद, बजरंग पाटील, उपशहरप्रमुख रोहिदास चव्हाण, काकाजी जीवरग, दिपक धुरेकर, रतन नलावाडे, नामदेव सागडे, प्रभागप्रमुख शुभम साळे, भगवान देशमुख, विनोद कदम, संजय मुरादे, विलास सासवाडे, शंकर राठोड, विभागप्रमुख अशोक कटारे, नरसिंग ढगे, पंढरीनाथ चोपडे, विनोद सोनवणे, लहू खराटे, तिसगाव विभागप्रमुख विनोद दाभाडे, दौलताबाद उपतालुकाप्रमुख मनीष गाजरे, विभागप्रमुख रामू सुरासे, माळीवाडा शाखाप्रमुख नंदकिशोर मुळे, दौलताबाद विभागप्रमुख सतीश काळे, आबासाहेब सपाटे, बजाजनगर शाखाप्रमुख राजू चव्हाण, श्रीनिवास मराठे, संजय सोनुने, गोकुळ साळुंके आदी पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती होती.
बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करावे, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यासाठी सातत्याने आवाज उठवावा आणि पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचवावी. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आगामी वडगाव (को.)-बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच तयारीला लागण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाची संघटनात्मक ताकद पणाला लावत पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविण्याचा निर्धार यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी व्यक्त केला.
स्थानिक पातळीवरील पक्षसंघटनेची सद्यस्थिती, विविध प्रश्न तसेच आगामी काळातील पक्षाच्या उपक्रमांबाबतही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
