
वाळूज महानगर – एका कंपनी जवळून बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचे कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात करण्यासाठी अपहरण केले. जिकठाण शिवारातील ही घटना 12 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील एक कुटुंब जिकठाण शिवारातील एका कंपनीजवळ राहून मोल मजुरी करत असे. त्यांची 12 वर्षे 24 दिवसाची मुलगी हसीना खातुन मोहम्मद असलम ही मी, बाहेर जाऊन येते असे आईला सांगून 12 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास गेली. मात्र ती अद्यापही परत आली नाही. हसीना खातून हिचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तिस फुस लावुन पळवून नेले. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुखदेव भागडे करीत आहे.
हसीना मोहम्मद असलम हिचे वर्णन असे –
वय-12 वर्ष 24 दिवस, रा.जिकठाण फाटा स्टिल कंपनीजवळ, ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर, रंग-गोरा, केस काळे मध्यम, बांधा- मध्यम, उंची 4 फुट 9 इंच, चेहरा- लांबट आकाराचा, अंगात हिरव्या रंगाचा शालवार, पायात चप्पल भाषा – मराठी, हिंदी,भोजपुरी बोलते.

Bài viết hay, mình học được nhiều điều. Letco là địa chỉ du học Hàn Quốc đáng tin cậy, hỗ trợ toàn diện từ tiếng Hàn đến visa. Xem tại letco.vn.
[821153]supplies professional anti-violence equipments and solutions for the whole world with strong and perfect production capacity. anti-violence.org