November 9, 2026


वाळूज महानगर – वर्षेभरातील सर्वांत मोठा सण म्हणुन साजरा केला जाणारा दिपावली सणाच्या अनुषंगाने सलग चौथ्या वर्षी सामाजिक विचार मंचतर्फे बजाजनगर येथे संगीत रसिकांसाठी रविवारी 8 नोव्हेंबर रोजी दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सामाजिक विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष गजानन नांदुरकर, अध्यक्ष केशव ढोले, सचिव रविंद्र शेलगावकर, उद्योजक पोपटराव थोरात, रेखा हिंगणकर, रेखा नांदुरकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी भाग्यश्री अभ्यंकर व सहकार्यांनी मराठी व हिंदी गाण्यांची सुरेल मेजवानीचे सादरीकरण करत उपस्थित संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. व रसिकांनी कोकणी, खान्देशी व लावण्या सारख्या मराठमोळ्या गीतांवर नृत्याचा ठेका धरून टाळ्यांचा वर्षाव केला. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री संजय शिरसाट, नंदकुमार घोडीले यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. या दिवाळी पहाटसाठी उद्योजक कैलास भोकरे, वडगाव (को.) चे सरपंच सुनील काळे, बाळासाहेब गाढे, रत्नमाला ढमढेरे, दशरथ मुळे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उद्योजक संतोष निंबुळकर, रमेश बल्की, शेखर राणे, दिलीप खेडकर, लहू बोरसे, ज्ञानेश्वर खोबरे, दिलीप मस्के, सूर्यकांत सणस, संतोष दोषी, गोरख पुजारी, अशोक शिंदे, मुलचंद माकडे, राजेंद्र जाधव, डॉ माले आदींनी सहकार्य केले. संगीता पाटील, रेखा पाटील, भारती शेलगावकर, वनिता वडोदकर, सविता राऊत, कल्पना वाकडे, अंकिता राऊत, धनश्री हिंगणकर, किरण हणुमंते, साधना पाटील, रिया पाटील, अमर निकम, किशोर सेलकर, माणिक कुंभार, बी.जी.पाटील, ऋषिकेश पाटील, शिवाजी राऊत, परमेश्वर गणाचार्य, विश्वनाथ धोंडगे, व्यंकटेश भोरे, शंकर टिकम, विनोद वडोदकर, महादेव छपरे, सुरेश वंजारी, गणेश पळसकर, रामेश्वर जोशी, संजय हणुमंते, सुरेश शिंदे, प्रकाश भगत, चंद्रकांत तांबवे, रघुनाथ पहेलवान, कृष्णा वाघ आदिंनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *