July 26, 2026


वाळूजमहानगर – रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर व बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल येथे आषाढी एकादशी निमित्ताने भक्तिमय वातावरणात दिंडी व वारीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई व वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषात आणि अभंग-भजनांच्या सुरावटीत उत्साहाने दिंडीत सहभाग घेतला.

प्रथम शाळेच्या परिसरात विठ्ठल-रुक्मिणीची आकर्षक प्रतिमा सजविण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांच्या अभंगांचे सादरीकरण करून वारकरी परंपरेचा संदेश दिला. यावेळी शिक्षकांनी आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, संस्कार, शिस्त आणि भारतीय संस्कृतीबद्दल आदर निर्माण झाला.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आय.जी. जाधव, संस्थेचे सचिव हरीष जाधव, प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, उपमुख्याध्यापक शहाजी मंगनाळे, प्राथमिक विभाग प्रमुख मनीषा नवथर, इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक रेखा बिदरकर सर्व शिक्षक विशाल जाधव, अशोक तारडे, संदीप हिंगणकर, उल्हास वाघ, सुनील शिंदे, अनुराधा मुळे, स्वाती सूर्यवंशी, परमेश्वर गीते, गुलाब मोहिते, कल्याण कुलकर्णी, तृप्ती लकडे, अनिता पंजावाले, पूजा गाडेकर, छाया वागदरे, विजयाक्रांती पवार, सोनी शुक्ला, प्रतिभा मुंडे, पूजा ठाकूर, पूजा खोतकर, ममता खोतकर, श्रद्धा सोनवणे, अस्मिता तायडे, विनया पत्की, अंकिता कुरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. “पांडुरंग हरी, विठ्ठल हरी” च्या गजरात कार्यक्रमाची सांगता केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *