
वाळूजमहानगर (प्रतिनिधी) :- अतिक्रमण नियमकुल कायद्यानुसार पंढरपूर येथील गायरान जमिनीवर असलेल्या 384 अतिक्रमणाचा प्रस्ताव सोमवारी 7 सप्टेंबर रोजी पंचायत समितीकडे सादर करण्यात आले.
यावेळी उपसभापती बाळासाहेब पाटील गाढे, गट विकास अधिकारी शिवाजी साळुंके, माजी सरपंच शेख अख्तर, ग्रामपंचायत अधिकारी हरीश आंधळे, एकनाथ सोनवणे व एकनाथ कीर्तिकर उपस्थित होते.
