
वाळूजमहानगर (प्रतिनिधी) :- स्मशानभूमी ही मानवी जीवनाचा अंतिम टप्पा असली, तरी तिथे लावलेले वृक्ष हे नवीन जीवनाची आणि शुद्ध हवेची सुरुवात करतात. स्मशानभूमीच्या परिसरात हिरवळ निर्माण करून या जागेला शांतता आणि मांगल्याचे रूप देणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे,” असा सुंदर संदेश देत ‘इप्का फाउंडेशन’ व ‘पर्यावरण टेकडी परिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने घाणेगाव येथील स्मशानभूमी परिसरात गुरुवार 3 सप्टेंबर 2026 रोजी भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली.

या उपक्रमांतर्गत जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी विविध प्रजातींच्या पर्यावरणपूरक झाडांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी इप्का फाउंडेशनचे व्यंकट मैलापूरे, संजय चौबे, एकनाथ पवार, प्रफुल्ल कांबळे, आणि रमेश बिरादार प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्यासोबतच पर्यावरणासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या ‘पर्यावरण टेकडी’ समितीचे पदाधिकारी आणि सदस्यही मोठ्या संख्येने हजर होते. यामध्ये टेकडी पर्यावरण समितीचे रुपचंद अग्रवाल, प्रकाश भगत, बाळासाहेब माने, कैलास चव्हाण, नवनाथ राजे, साडू पवार, साहेबराव पवार, योगेश फुके, ओमप्रकाश कासानीय, बटूगिर बावा, घाणेगावचे पर्यावरणप्रेमी तसेच ग्रामसेवक गणेश बोळसेकर, ज्ञानेश्वर गायके, केशव गायके, कैलास गायके, श्याम बनसोडे, रंगनाथ काळवणे, जगन गायके, सचिन काळवणे आणि नंदकिशोर पवार यांचा सक्रिय सहभाग होता. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मशानभूमीच्या परिसरात विविध प्रकारच्या सावली देणाऱ्या आणि औषधी वनस्पतींच्या रोपांची लागवड करण्यात आली.
“केवळ वृक्षारोपण न करता या लावलेल्या झाडांचे पुढील काळात उत्तम संगोपन, जतन, संवर्धन, पाणीपुरवठा व देखभाल करण्याची जबाबदारी ‘पर्यावरण टेकडी या संस्थेने स्वीकारली आहे. लावण्यात आलेल्या वृक्षांची नियमित देखभाल करून त्यांचे योग्य प्रकारे संगोपन करण्यात येईल, असे पर्यावरण टेकडी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी इप्का फाउंडेशनच्या प्रतिनिधीला आश्वासन दिले.
इप्का फाउंडेशन आणि पर्यावरण टेकडी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल घाणेगाव येथील ग्रामस्थांनी सर्वांचे विशेष आभार मानले आहेत.

