September 30, 2026

 

वाळुजमहानगर – गावातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायत रांजणगाव (शे.पू.) आणि नागार्जुन स्वच्छता टीमच्या वतीने नागरिकांना घनकचरा व्यवस्थापनाबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी घरातील कचरा रस्त्यावर, डिव्हायडरवर, मोकळ्या जागेत, नदीपात्रात किंवा नाल्यामध्ये टाकण्याऐवजी आपल्या घराजवळ येणाऱ्या घंटागाडीमध्येच कचरा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

         घरीच करा वर्गीकरण –
घरातून कचरा देताना ओला, सुका, हानिकारक आणि ई-वेस्ट कचरा स्वतंत्रपणे वर्गीकृत करून घंटागाडीमध्ये द्यावा. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण केल्यास त्याची प्रक्रिया व पुनर्वापर करणे सुलभ होते. त्यामुळे नागरिकांनी घरीच कचरा विलगीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नसता दांडात्मक कारवाई –
गावातील डिव्हायडर, रस्त्याच्या कडेला तसेच मोकळ्या जागांवर कचरा टाकण्याचे प्रकार आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना आढळल्यास ५०० ते ५,००० पर्यंत दंड आकारण्यात येईल, अशी सूचना ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे.

घरमालकांचीही जबाबदारी निश्चित –
गावातील घरमालकांनी आपल्या भाडेकरूंना कचरा घंटागाडीमध्येच देण्याबाबत स्पष्ट सूचना कराव्यात. भाडेकरूकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याचे आढळून आल्यास संबंधित घरमालकावर १५,००० पर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत व स्वच्छता टीमच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

            प्लास्टिक कचऱ्याबाबत विशेष आवाहन – प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या व इतर प्लास्टिक कचरा रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता स्वतंत्रपणे जमा करून घंटागाडीमध्येच द्यावा. प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

   तीन बाबींचे पालन केल्यास गाव स्वच्छ व सुंदर –
गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून, केवळ ग्रामपंचायत किंवा स्वच्छता कर्मचाऱ्यांची जबाबदारी न मानता प्रत्येक नागरिकाने आपल्या घरापासून स्वच्छतेची सुरुवात करावी. कचरा घंटागाडीत देणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे या तीन बाबींचे पालन केल्यास रांजणगाव (शे.पू.) स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मोठी मदत होणार आहे.

कचरा रस्त्यावर नाही, घंटागाडीतच –
आपले घर स्वच्छ असावे ते सुंदर दिसावे. म्हणून आपण दररोज घर झाडून पुसून घेतो. निघालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावतो. त्य व सुंदर दिसावे म्हणून कचरा रस्त्यावर नाही, तर घंटागाडीतच टाकावा. ती आपली जबाबदारी आहे. असे आदेशपर आवाहन ग्रामपंचायत रांजणगाव (शे.पू.) व नागार्जुन स्वच्छता टीम यांनी केले आहे. दरम्यान रविवारपासून ते मंगळवारपर्यंत 27 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती रांजणगाव (शेणपुंजी) चे ग्रामपंचायत अधिकारी गणेश धनवई यांनी दिली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *