May 29, 2026

वाळूज महानगर, (ता.29) – वाळूज येथे एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर किरायाने राहत असलेल्याची केंद्रीय तपास यंत्रणेकडून सुमारे पाच तास झाडाझडती घेऊन त्या संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. शुक्रवारी 29 मे रोजी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या कारवाईबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली असल्याने या कारवाईचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दहशतवाद विरोधी कारवाई करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचे एक पथक वाळुज मध्ये शुक्रवारी 29 मे रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास दाखल झाले. पाच जणांच्या या पथकाने वाळूज येथील कमलापूर रोडवर असलेल्या श्रद्धा कॉलनी शिवाजीनगर येथे एका पूर्व मुखी इमारतीच्या वरच्या मजल्यावर काही संशयित आरोपीची सुमारे पाच तास झाडाझडती घेत कसून चौकशी केली. या चौकशी दरम्यान पोलीस आयुक्त आणि वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. पोलीस वाहनांचा ताफा व पोलिस बंदोबस्त यामुळे वाळूज येथे मोठी खळबळ उडाली असून अनेकांचे कान या घटनेमुळे या टवकारले.

भारत-पाकिस्तान सीमेपार शस्त्रे, दारुगोळा आणि IED तस्करी प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या या आरोपीचा हात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या झाडाझडती दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणेच्या हाती अनेक महत्त्वाचे धागेदोरे लागल्याची शक्यता असल्याचेही बोलल्या जात आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. मात्र या प्रकरणात अधिकृत माहिती देण्यास या पथकाने टाळले. त्यामुळे वाळूज परिसरात मोठी खळबळ वडाली असून परिसरात चिंतेचे वातावरण आहे.

       

           चार राज्यांत छापेमारी –

भारत-पाकिस्तान सीमेपार शस्त्रे, दारुगोळा आणि IED तस्करी प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने शुक्रवारी 29 मे रोजी महाराष्ट्रात 3, उत्तर प्रदेशात 4, , राजस्थानातील 2, बिहारमध्ये 3 अशा चार राज्यातील 12 ठिकाणी छापेमारी करून मोठी शोध मोहीम राबवली. वाळुज मध्ये करण्यात आलेली ही कारवाई त्याचाच एक भाग असल्याचे समजते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *