September 19, 2026

वाळूज महानगर :- रांजणगाव (शेणपुंजी) ग्रामपंचायतीच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन गुरुवारी 17 सप्टेंबर रोजी मोठ्याउत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नागार्जुन एज्युकेशनल अँड सोसिअल ट्रस्टची स्वच्छता टीम विशेष उपस्थित होती. ​कार्यक्रमानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व ट्रस्टच्या स्वच्छता टीमची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. यात रांजणगाव (शेणपुंजी) हे गाव स्वच्छ, सुंदर, हरित व कचरामुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत परिसरातील कचरा संकलनाची सद्यस्थिती, कार्यपद्धती व दैनंदिन स्वच्छता कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ​या बैठकीस नागार्जुन एज्युकेशनल अँड सोसिअल ट्रस्टच्या संचालिका किरण बोराडे, संचालक साहिल तूरकर व संचालक किशोर म्हस्के यांची विशेष उपस्थिती होती. ​तसेच ग्रामपंचायतचे प्रशासक अशोक घोडके, ग्रामपंचायत अधिकारी गणेश धनवई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक बडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तू हिवाळे, बाबूराव हिवाळे, भीमराव कीर्तिकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


​या प्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गायके, बाळू कुऱ्हाडे, किशोर काळवने, सिद्धू मुळे, दीपक पंडित, शशिकांत सुरवसे, सुनील वाकूडकर, कलीम शेख, उमेश गवळी, राजू देसाई, वैभव पंडित, संतोष बोटवे, संतोष जैस्वाल यासह सफाई कामगार व घंटागाडीचे चालक उपस्थित होते. ​बैठकीदरम्यान सध्या कार्यरत कचरा संकलन कर्मचाऱ्यांची स्वच्छता टीमशी ओळख करून देण्यात आली. त्यानंतर स्वच्छता टीमने सुपरवायझर यांच्या समवेत संपूर्ण ग्रामपंचायत परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दरम्यान कचरा संकलन व्यवस्था, स्वच्छतेची सद्यस्थिती आणि दैनंदिन कामकाजाबाबत आवश्यक प्राथमिक माहिती घेण्यात आली.

​सेवा संकल्प अभियान व घनकचरा व्यवस्थापन नियमावली:
जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी. एम. (भा.प्र.से.) यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ व स्वच्छता मोहिमेचे प्रभावी नियोजन केले जात आहे. त्यानुरूप, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जारी केलेल्या ‘घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६’ च्या कडक अंमलबजावणीबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. गावात ओला, सुका, सॅनिटरी व घरगुती धोकादायक अशा ४ प्रकारांत कचरा विलगीकरण करणे, अवर्गीकृत कचरा देणाऱ्यांवर व उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे आणि वापरकर्ता शुल्क (User Charges) संकलन परिणामकारकरीत्या लागू करण्याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने नियोजन केले जात आहे.

   गाव स्वच्छ, सुंदर, हरित व कचरामुक्त करण्याचा संकल्प – नागार्जुन एज्युकेशनल अँड सोसिअल ट्रस्टच्या स्वच्छता टीमच्या माध्यमातून गावातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन अधिक नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि प्रभावी करण्यासाठी ​ग्रामपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि स्वच्छता टीम यांच्या एकत्रित समन्वयातून रांजणगाव (शे.पू.) अधिक स्वच्छ, सुंदर, हरित व कचरामुक्त करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *