April 30, 2026

वाळूज महानगर, (ता.30) – वाळूज परिसरातील रांजणगाव (शे.पु) तालुका गंगापूर येथे गुरुवारी 30 एप्रिल 2026 रोजी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची 117 वी जयंती ग्राम जयंती म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या ग्राम जयंती कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे हरिभक्त गोटीराम राऊत महाराज, माजी पंचायत समिती सदस्य मनोहर गवई यांच्या हस्ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच ग्रामगीता वाचक, प्रचारक माधव महाराज सेनगावकर खंजीर भजन व या भारतात बंधुभाव वसु दे हे गीत गायले. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रवंदना घेतली. या कार्यक्रमासाठी देवगिरी कॉलनी गल्ली नंबर सहा मधील नागरीक आणि अखिल विषय जागृती प्रतिष्ठानचे सदस्य माधव महाराज सेनगावकर समाधान ठाकूर, गणेश कस्तुरे, शैलेश ठाकूर, बद्री पवार, प्रथमेश वाहूळ, अमोल पवार, दत्तात्रय तौर, बंडूभाऊ भराड, मंजुषा वाहुळ, शितल ठाकूर, कमल पवार, मंगल कस्तुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *