
वाळूज महानगर, (ता.2) – गंगापूर तालुक्यातील दहेगाव शिवारात एका 21 वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांसह रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व अनिकेत मुळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह छत्रपती संभाजीनगर घाटी येथे दाखल केला. ही घटना शुक्रवारी 1 मे रोजी भल्या पहाटे घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी 1 मे रोजी भल्या पहाटे सुमारे 2 वाजता पोलिस कंट्रोलमार्फत माहिती मिळताच डायल 112 मोबाईल रात्रपाळी पोलिस अमलदार घुगरे व त्रिभुवन यांनी दहेगाव (बंगला) येथे धाव घेतली असता सोमीनाथ बोरुडे, रामेश्वर बोरुडे, गणेश बोरुडे, सतीश पंडित यांनी महिला विहिरीमध्ये पडली असल्याचे सांगितले. तेथे पाहणी केली असता विहिरीच्या कडेला एक मोबाईल, दुपट्टा, चप्पल दिसली. त्यानंतर ही माहिती वाळूज पोलीस ठाण्याचे पीएसआय सोनवणे तसेच दरोडा पेट्रोलिंगचे उत्तम शिंदे यांना दिल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला विहिरीमधून बाहेर काढण्यासाठी कांचनवाडी येथील फायर ब्रिगेड व खाजगी रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व अनिकेत मुळक यांना बोलून महिलेचा मृतदेह विहिरीमधून बाहेर काढून पुढील कारवाईकांनी नातेवाईकासह घाटी दवाखाना छत्रपती संभाजीनगर येथे रवाना केले.
मयत महिलेचे नाव नम्रता आत्माराम बोरुडे (वय 21 वर्षे) रा. दहेगाव बंगला दत्त मंदिर अहिल्यानगर रोड असे असून तिच्या पतीचे नाव आत्माराम रामेश्वर बोरुडे (वय 24 वर्ष), सासरे पूर्ण नाव रामेश्वर लक्ष्मण बोरुडे (वय 52 वर्ष), सासू पूर्ण नाव अनिता रामेश्वर बोरुडे (वय 46 वर्ष), भाया पूर्ण नाव सोमीनाथ रामेश्वर बोरुडे (वय 30 वर्ष) असे आहे मयत महिलेचे लग्न 15 एप्रिल 2022 रोजी राजमाता लॉन्स करोडी येथे झाले आहे. पुढील तपास वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
