July 8, 2026


वाळूज महानगर, (ता. 8) – हातात तलवार घेऊन, सोशल मीडियावर रील टाकून परिसरात भीती व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका 23 वर्षीय तलवारधारी आरोपीला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी (ता. 8) रोजी जेरबंद केले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी आनंद गणेश मानकर वय 23 वर्ष रा. विशाल महेर यांचे घरी भाड्याने अयोध्यानगर वडगाव (कोल्हाटी), छत्रपती संभाजीनगर याने सोमवारी सहा जुलै रोजी हातात तलवार घेऊन रील बनवून ती सोशल मीडियावर टाकून परिसरात दहशत व भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
ही माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी ठाण्याच्या विशेष पथकाचे अधिकारी पोउपनि. सागर पाटील यांनी त्याचा शोध घेतला असता तो तलावारी सह मिळुन आला. या प्रकरणी पोलीस ठाणे एमआयडीसी वाळूज येथे गुन्हा क्रमांक 647/2026 अन्वये शस्त्र अधिनियमाच्या कलम 4 व 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई सुरूच राहणार – वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे
सामाजिक माध्यमांवर शस्त्रांचे प्रदर्शन करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्या तसेच समाजात दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी यावेळी दिला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *