April 30, 2026

वाळूज महानगर, (ता.29)- राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जयंती निमित्त रांजणगाव शेणपुंजी येथे गुरुवारी 30 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता प्रतिमा पूजन, महाआरती, ध्यान, पाठ व सायंकाळी सहा वाजता प्रार्थना घेण्यात येणार आहे.

देवगिरी कॉलनी, गल्ली नंबर 6 रांजणगाव शेणपुंजी) येथे अखिल विश्व जागृती प्रतिष्ठान रांजणगाव (शेणपुंजी) च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष माधव महाराज शेनगावकर, उपाध्यक्ष बंडू भराड, सचिव गणेश कस्तुरे, सहसचिव दत्तात्रेय तोर, कोषाध्यक्ष समाधान आहेर अमोल ठाकूर, सदस्य – शैलेश ठाकूर, प्रथमेश वाहुळ बद्री पवार, महिला सदस्य शितल ठाकूर, कमल पवार, मंगल कस्तुरे मंजुषा वाहूळ यांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *