May 23, 2026

वाळूज महानगर, (ता.23) – अवघ्या चार दिवसापूर्वी स्थापन झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीने सोशल मीडियावरुन सुमारे 2 कोटींपर्यंत फोलोअर मिळवले. यामुळे राजकीय पक्षाचे धाबे दणाणले असून काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके भगवान दिपके यांना धमक्या मिळत असल्याने सुरक्षा म्हणून त्यांच्या सिडको वाळूज महानगर-1 येथील “शंकरसदन” बंगल्याभोवती शनिवार (ता 23) पासून पोलिसांनी कडक सुरक्षा लावली आहे.

येथील तिसगाव गट नं 170 मधील सिडको वाळूज महानगर -1 राजमाता जिजाऊ चौकात प्लांट नं. 61 या बंगल्यात राहणाऱ्या अभिजित दिपके या युवकाने सोशल मीडियावरुन कॉकरोच जनता पार्टी पक्षाची घोषणा केली असून, बेरोजगारी व नीट घोटाळ्या प्रकरणी आवाज उठवला आहे. यामुळे दिपके यांचे सोशल अकाऊंट बॅन करण्यात आले. शिवाय दिपके यांना नुकतीच सोशल मीडियावरुन धमकी देण्यात आली आहे. परिणामी अभिजितचे आई-वडील यांनी चिंता व्यक्त केली आहे. दिपके यांना दिलेली धमकी व पुढील गैरप्रकार घडून शांततेचा भंग होऊ नये. यासाठी शनिवारी सकाळी पोलीस आयुक्त, सहायक आयुक्त यांनी वाळूज महानगर येथील बंगल्यास भेट दिली. यावेळी त्यांनी दीपके यांच्या बंगल्याला सुरक्षा पुरविण्याचे. हा आदेश मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यासह विविध पथके घटनास्थळी दाखल झाले. या बंदोबस्त दरम्यान सुमारे 22 कर्मचारी व 2 अधिकार्यांकडून सुरक्षा तैनात करण्यात आली. परिणामी वाळूज महानगरातील या भागाला छावणीचे स्वरूप आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *