May 24, 2026

 


वाळूज महानगर, (ता.24)- अंदाजे एका 45 वर्षीय अनोळखी इसमाचा अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी धारदार हत्याराने गळा चिरून व दगडाने ठेचून निर्घृण खून करून त्याचा मृतदेह लवकी शिवारातील रस्त्यावर फेकून दिला. 18 मे रोजी दुपारी उघडकीस आलेल्या या अत्यंत सनसनाटी घटने प्रकरणी 23 मे रोजी रात्री अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास कासोडा येथील लवकी शिवारात अंदाजे 40 ते 45 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता मृतदेहाशेजारी रक्ताने माखलेले दगड, कपडे मिळून आले. शिवाय त्याचा गळा शिरलेला होता. त्यामुळे ही घातपाताची शक्यता वर्तवत पोलिसांनी मृतदेह घाटीत दाखल करून त्याचे पोस्टमार्टम केले. त्याच्या अहवालावरून अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी त्या अनोळखी इसमाचा धारदार हत्याराने गळा कापून व त्याच्या शरीरावर दगडाने विविध ठिकाणी वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची अत्यंत सनसनाटी घटना उघडकीस आली.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 103 (1) बीएनएस प्रमाणे गुन्हा 23 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय गीते करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *