August 6, 2026


वाळूजमहानगर, (ता.10) – वाहनधारकांसाठी केंद्र शासनाने लागू केलेल्या हिट अँड रन बुधवारी (ता.10) रोजी पुन्हा ट्रॅक चालक आक्रमक झाले. यावेळी वाळुज औद्योगिक वसाहतीतील कामगार चौक, ओएसिस चौक येथे रस्ता रोको करण्यात आला. तसेच रांजणगाव येथील संभाजी चौकातही रस्ता अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता केंद्र शासनाने वाहनधारकांविरोधात हिट अँड रन कायदा केला. या कायद्याच्या निषेधार्थ देशभर विरोध करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात ट्रॅक चालकांनी संप पुकारत आंदोलन छेडले होते. मात्र कायदा लागू होणार नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले होते. मात्र बुधवारी (ता.10) रोजी दुपारी पुन्हा अचानक वाळूज महानगरातील चालक मालक संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर – नगर महामार्गावरील कामगार चौक व ओएसीस चौकात येथे आंदोलन सुरू केले.

ही माहिती मिळताच वाळुज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक अविनाश आघाव यांनी फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत दोन्ही बाजूच्या वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढत वाहतूक सुरूळीत केली. तसेच रांजणगाव येथील संभाजी चौकातही रस्ता अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

About Author

1 thought on “हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालक पुन्हा रस्त्यावर

  1. Simly wnt too sayy your article iss aas astounding. The clarity
    on yor post is simly excellent andd that i can thijnk yoou
    aree knwledgeable on this subject. Weell togethher wuth your permssion allkow me
    to grabb you fee too stay updazted wjth imminent
    post. Thank youu 1,000,000 aand please copntinue the gratifyiing
    work.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *