April 15, 2026


वाळूज महानगर (ता.13) – मुंबई येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 11 एप्रिल 2026 रोजी झालेल्या प्रतिष्ठित ‘श्री नारायण मेघाजी लोखंडे’ सुरक्षा व्यवस्थापन आणि आरोग्य पुरस्कार – 2026′ सोहळ्यात छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक वसाहतीतील मेटलमन ऑटो लिमिटेडला गौरवण्यात आले.

कंपनीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (Director & COO) श्रीकांत मुंदडा, अनिलकुमार डहाळे, आशिष शर्मा  यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीच्या बी-12 प्लँट (छत्रपती संभाजीनगर) ने ‘धोकादायक कारखाने’ (Hazardous Factories) या श्रेणीमध्ये उत्कृष्ट सुरक्षा आणि आरोग्य जपल्याबद्दल रौप्य पदक (द्वितीय पुरस्कार) पटकावले आहे. हे यश कंपनीच्या सुरक्षिततेप्रती असलेल्या वचनबद्धतेवर शिक्कामोर्तब करते.

दिग्गजांच्या हस्ते सन्मान –
राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मेटलमन ऑटो लिमिटेडच्या वतीने एजीएम-एचआर (AGM-HR) विजय साळवे, सुरक्षा अधिकारी गजानन वतनदार, अक्षय शेळके आणि त्यांच्या सुरक्षा टीमने हा सन्मान स्वीकारला.

    “सुरक्षा प्रथम” हीच आमची संस्कृती
या यशाबद्दल बोलताना व्यवस्थापनाने सांगितले की, “हा पुरस्कार आमच्या ‘सेफ्टी फर्स्ट’ (सुरक्षा प्रथम) या संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. मेटलमन ऑटोमध्ये सुरक्षा ही केवळ एक सराव नसून आमचे मुख्य मूल्य आहे. सातत्यपूर्ण सुधारणा आणि शिस्तबद्ध अंमलबजावणीमुळेच आम्ही हे यश संपादन करू शकलो आहोत.”

या यशात सादरीकरणासाठी गजानन वतनदार, सचिन तायडे, निकिता लेंडे, गुरुदास पराते यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल संपूर्ण टीमचे स्वागत करण्यात येत असून, भविष्यात सुरक्षित कामाच्या ठिकाणी नवीन मानके प्रस्थापित करण्याचा निर्धार कंपनीने व्यक्त केला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *