September 24, 2026


वाळूज महानगर :- ग्रामपंचायत माळीवाडा येथील अंगणवाडी क्रमांक-3 या ठिकाणी वेलकम मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये अंगणवाडी विद्यार्थ्यांचं वेलकम करून दैनंदिन आहार, दैनंदिन जीवन, दैनंदिन माता आहार, बालक आहार, लसीकरण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी बी.बी. गव्हाणे यांनी महिला व बालविकास या उपक्रमा अंतर्गत सखोल मार्गदर्शन केले. प्रथम मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन केले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या लंका जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्या मंदाकिनी कीर्तीकर, कडू कीर्तीकर, मनेश गाजरे, नंदकिशोर मुळे, ग्रामपंचायत अधिकारी बी.बी.गव्हाणे, पोलीस पाटील प्रमोद साठे, पत्रकार शिवाजी आस्वार, ताराबाई तुपे, एस.एस काथार, अंगणवाडी पर्यवेक्षिका मोरकर, गोपीचंद कुंमरे, बब्बूभाई, गणेश आस्वार ग्रामपंचायत लिपिक, ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच दौलताबाद, अब्दिमंडी, रावरसपुरा, शरणापुर, करोडी, केसापुरी, रामपुरी, सिरसमाळ येथील अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्यासह परिसरातील माता-पालक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण गव्हाणे यांनी प्रभावी केले. राष्ट्रगीत, राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *