March 23, 2026


वाळुज महानगर (ता.10)- जागतिक महीला दिनानिमित्त समाजसेविका स्मिता जनार्दन पटारे यांना मराठा बिझनेस नेटवर्क महीला ग्रूप यांच्या वतीने हिरकणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजीनगर येथे आयोजीत कार्यक्रमात तहसीलदार अश्विनी बारहाते, वरिष्ठ लेखापरीक्षक साधना बांगरघारे, डॉ. पल्लवी लोखंडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा 6 मार्च रोजी पार पडला.

यावेळी मराठा बिझनेस नेटवर्कचे अध्यक्ष अरुण पेरे, महीला विंगच्या किरण काळे, आयोजन समिती अध्यक्ष नीलम खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. स्मिता पटारे या पॅरा ओलंपिक असोसिएशनच्या डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून कार्यरत असून दिव्यांग खेळाडूंसाठी मार्गदर्शक म्हणून काम पाहतात. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पतीच्या निधनानंतर दोन्हीही मुलांचा योग्य सांभाळ करून त्यांना शिक्षणात तसेच खेळात नेत्र दीपक कामगिरी करण्यासाठी त्यांनी मोठे परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *