March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.1)- ज्वलनशील गॅसची वाहतूक करणाऱ्या धावत्या टँकरला अपघात झाल्याने गॅस गळती सुरू झाली. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

दरम्यान टँकरवर पाण्याचा मारा सुरू केला जात आहे. हा अपघात गुरुवारी (ता.1) फेब्रुवारी रोजी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवर झाला. सकाळी सकाळी घडलेल्या या थरारक घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. घटनास्थळी 10 अग्निशमन दलाचे बंब, पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी हजर असून बाबा पेट्रोल पंपाकडून क्रांती चौककडे आणि सिडको बस स्थानक चौकाकडून क्रांती चौकाकडे येणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे परिसरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला असून कोणीही घरातील गॅस किंवा ज्वलनशील वस्तू पेटवू नये. असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. अपघात ग्रस्त टँकर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुरक्षित स्थळी हलवण्यावर चर्चा सुरू आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *