
वाळूजमहानगर, (ता.15)- रस्ता ओलांडणाऱ्या एका 57 वर्षीय इसमास भरधाव जाणाऱ्या बसने चोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला. हा अपघात छत्रपती संभाजीनगर पुणे हायवेवरील जिकठाण फाटा येथे सोमवारी (ता.15) रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास जिकठाण फाटा येथे झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भास्कर कचरू जाधव, (वय 57) रा. टेंभापुरी हे जिकठाण फाटा येथून छत्रपती संभाजीनगर पुणे हायवे ओलांडत होते. याचवेळी भरधाव आलेल्या एसटी बस (एम एच 14, बीटी- 3336) ने जोरदार धडक दिली. या अपघातात जाधव हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती कळताच लिंबेजळगाव पॉईंटवरील श्री जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानची 24 तास सेवेत असणारी विनामूल्य रुग्णवाहिकेचे पायलट संदीप त्रिंबके यांनी त्वरित घटनास्थळी हजर होऊन अपघात ग्रस्ताला उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले.
