
वाळूजमहानगर, (ता.13) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील न्यू शहीद भगतसिंग विद्यालयात राजमाता, जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (ता.12) रोजी करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका भारतीय साळुंके यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून कोषाध्यक्ष अक्षय हरकळ, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक इस्माईल शेख, मंदा नायके, बाळू खोपडे, वाहेद पठाण यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत महावाचनदिनाचे आयोजन देखील या निमित्ताने करण्यात आले होते. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक इस्माईल शेख यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन उत्कर्ष आहेर यांनी तर आभार आदिनाथ आडसरे यांनी मानले.
