
वाळुज महानगर, (ता.4)- महाराष्ट्र मराठी शाळा वाळूज येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष नबी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार (ता.3) रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक तथा सहारा एज्युकेशन व वैद्यकीय सेवा मंडळ औरंगाबादचे प्रशासकीय अधिकारी अफसर पटेल व प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य वाळूज तोफिक पटेल यांची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षनी सावित्रीबाई फुले “यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जीवनचरित्राविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मुलींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली होती. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
रवींद्र उक्रिडे, इरफान शेख, शेख कणीस, अय्युब सय्यद, रफिक शेख, योगेश मोर्ये, अरविंद गोरे, संतोष खरात, रवींद्र फरकाडे, शिराळ ज्ञानेश्वर, शेख ताजुद्दीन, किसन बारवाल इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.
