February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.29) – बत्तीस वर्षी विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रांजणगाव (शेणपुंजी) येथील हरी ओमनगरात गुरुवारी (ता.28) रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अर्चना संतोष शिंदे (वय 32) रा. रुई (बु) ता.नायगा जि.नांदेड (ह.मु हरिओमनगर रांजणगाव, शेणपुंजी ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर या महिलेने राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने छताच्या हुकाला गळफास घेतला. गुरुवारी (ता.28) रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस येताच असेल तिला बेशुद्ध अवस्थेत सोपान अशोक कदम व संतोष शिंदे यांनी घाटी दवाखाना अपघात विभागात दाखल केले. तिला तपासून डॉक्टरांनी सायंकाळी 7.25 वाजेच्या सुमारास मयत घोषित केले. याप्रकरणी बेगमपुरा घाटी मेडीकल चौकीचे पोलीस नाईक सी.बी.सानप त्यांनी दिलेल्या खबरीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *