
वाळूजमहानगर (ता.08) – ग्रामपंचायत कार्यालय वळदगाव येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस (सानुग्रह) 10 हजार 300 रुपये प्रमाणे प्रत्येकी एक पगार असे धनादेश स्वरूपात बुधवारी (ता.8) रोजी वाटप करण्यात आले.

ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या छोट्याखाणी कार्यक्रमप्रसंगी सरपंच अमर कचरूसिंग डांगर, उपसरपंच संजय त्रिंबकराव झळके, ग्रामविकास अधिकारी. बळीराम धर्मु राठोड, तसेच ग्रामपंचायत सदस्य गणेश कडूबा नवले, विष्णू रंगनाथ झळके, अशोक रमेश खोतकर, रितेश चुन्नीलाल पहाडिये, राजेंद्र हरीभाऊ मुसळे, नितेश विजय चुंगडे, शेख चांदपाशा, शेख शफीक शेख चांद, जालिंदर खोतकर, राधा मरमट आदींची उपस्थिती होती.
