February 5, 2026


वाळूजमहानगर ता.(08) – प्लॉट घेण्यासाठी माहेरहुन पैसे आणण्याच्या कारणावरून 23 वर्षीय विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सासरकडील पाच जणांविरुद्ध बुधवारी (ता.8) वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी सागर भगवान गिरी, राधाबाई भगवान गिरी (सासु), भगवान मंजबा गिरी (सासरे), प्रमोद भगवान गिरी (दिर), सर्व रा. भवन, ता.सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर व सुनंदा योगेश भारती (नणंद) रा.सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर यांनी संगनमत करुन गीता सागर गिरी (23), रा. भवन ता. सिल्लोड जि. छञपती संभाजीनगर (ह. मु. गट नं 34 प्लाँट नं 43 रांजणगाव) हिस कौटुंबिक कारणावरुन भांडण करुन माहेरावरुन प्लॉट खरेदी करण्यासाठी पैसे आणण्याचे कारणावरुन तिचा शारीरिक व मानसिक छळ करुन शिवीगाळ करुन जीवे मारण्याच्या धमक्या. या प्रकरणी गीता गिरी यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 498(अ), 323, 504, 506, 34 भारतीय दंड विधान प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. राहुल निर्वळ करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *