March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.7) – वाळूज परिसरातील कासोडा ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता.6) रोजी जाहीर झाला. यात पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या एकता ग्रामविकास पॅनलचे 7 पैकी 6 जागा पटकावल्या. तर महाविकास आघाडीच्या एकता ग्रामविकास पॅनला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. निकाल जाहीर होतात कार्यकर्त्यांनी फटाक्याची अतिषबाजी करत विजयी उमेदवारांची मिरवणूक काढली.

वाळूज परिसरातील कासोडा ग्रामपंचयत निवडणूक 2021 मध्ये झाली होती. त्यात एकता ग्रामविकास पॅनलचे 9 पैकी 8 सदस्य विजयी झाले होते. सरपंचपदी मंजुषा संदीप मनोरे तर उपसरपंचपदी राधाबाई किसन गुंढाळे यांची वर्णी लागली होती. परंतु डिसेंबर 2022 मध्ये 9 पैकी 6 सदस्यांचे सरपंच व उपसरपंचांसोबत मतभेद झाले. त्यामुळे सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा दिला होता. तेव्हापासून रिक्त असलेल्या 7 ग्रामपंचायत सदस्यांसाठी रविवारी (ता.5) पोटनिवडणूक घेण्यात आली. या मतदानाची सोमवारी (ता.6) रोजी गंगापूर तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. यात शिंदे गटाच्या एकता ग्रामविकास पॅनलचे संदीप गुलचंद मनोरे, अनिल साहेबराव हिवाळे, नितीन कैलास देवबोने, कैलास देवराव दाभाडे तसेच कल्पना पिराजी देवबोने या (दोन जागी) विजयी झाले. महाविकास आघाडीच्या एकता ग्रामविकास पॅनलला झुंबरबाई भागचंद देवबोने यांच्या रूपाने एकमेव जागा मिळाली. तर गोविंद धोत्रे, सुमनबाई कडु देवबोने, अनिल गोंविद धोत्रे, बद्रिनाथ रामचंद्र नवले, राजु दणके, विजय नवनाथ शिनगारे, ज्योति अनिल धोत्रे, रंजनाबाई शिवाजी वैद्य हे उमेदवार पराभूत झाले. यावेळी सरपंच मंजुषा मनोरे, उपसरपंच राधाबाई गुंढाळे यांनी मतदारांचे आभार मानले. माजी उपसरपंच विलास हिवाळे, बाबासाहेब पिठले, कल्याण हिवाळे, दत्तु हिवाळे, चंदु चामे, जनार्धन गुंढाळे, एकनाथ दाभाडे, ज्ञानेश्वर हिवाळे, गणेश मनोरे, शिवाजी वरकड, विठ्ठल दरेकर, राजु धोत्रे, ज्ञानेश्वर देवबोने, संताराम नवले, भाऊसाहेब मते, गणेश गिरबोनो, त्र्यंबक देवबोने, त्र्यंबक बोचरे, नानासाहेब शेळके, सदाशिव जाधव, विलास गायकवाड, भरत गुंढाळे यांची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया –
पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा माजी सभापती दिलीपसिंग राजपुत, तालुका प्रमुख दिलीप निरफळ यांच्या मागदर्शनाखाली आम्ही निवडणुक लढविली. आणि 7 पैकी 6 जागा मिळवल्या. मी जनतेचे आभार मानतो. आम्ही तीन वर्षीत केलेल्या कामाची पावती पोटनिवडणुकीत आम्हाला मिळाली. गावाच्या विकासासाठी व अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहु. सारंगधर जाधव (एकता ग्रामविकास पॅनल प्रमुख).

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *