March 23, 2026


वाळूजमहानगर (ता.06) – वाळूज परिसरातील इटावा ग्रामपंचायतचे सरपंच च्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानात सर्वाधिक 669 मते घेऊन कैलास दिगंबर शिनगारे हे निवडून आल्याने त्यांची सरपंचपदी वर्णी लागली आहे.

वाळूज परिसरातील इटावा ग्रामपंचायतच्या सरपंच रंगीता देवगणे यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्र व्हॅलिड नसल्याने त्यांचे सरपंच पद रद्द करण्यात आले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (ता.5) रोजी इटावा येथे गावातील सर्व जनतेतून मतदान घेण्यात आले. एसटी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या इटावाच्या सरपंचपदासाठी झालेल्या लढतीत कैलास दिगंबर शिनगारे, दिपाली भास्कर देवबोणे, नितीन श्रावण पवार व सुरेश हिरामण पवार या चार उमेदवारांनी आपले नशीब आजमावले.

त्यात कैलास शिनगारे यांना सर्वाधिक 669 मते मिळाल्याने त्यांची सरपंचपदी वर्णी लागली. सोमवारी (ता.6) रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शिनगारे यांच्या समर्थकांनी फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *