
वाळूजमहानगर (ता.06) – बजाजनगर येथील प्लाॅट नंबर एक्स -147, दिशा काॅम्प्लेक्स येथे बीअर बार व परमिट रूम सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये. या मागणीसाठी सुरू केलेले आमरण उपोषण इंद्रप्रस्थ सेवाभावी संस्था व रहिवासी नागरिक यांच्या प्रयत्नातून व राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा अधिकार्याच्याकडून मिळालेल्या पत्राद्वारे आश्वासित केल्यानंतर जगन्नाथ कोळी यांनी मोसंबीचा ज्युस घेऊन सोमवारी (ता.6) रोजी सोडले. 
याप्रसंगी उद्योजक हनुमान भोंडवे, गरुड झेपचे निलेश सोनवणे, भुमीपुत्र संस्थेचे पोपटराव आधिकपाटील, काकासाहेब चेळेकर, रामदास पैठणपगारे, प्रदीप माळी, नागेश शिंदे,
उषा हांडे, बाळासाहेब माने, धर्मेंद्र चौधरी, पांडुरंग मते, शिवदास भंवर, राजुळे नाना, संदिप भहादुरे, विजय गाडे, संजय नारखेडे, सतिश कोरडे, शिला शिंदे, अलका गाडे, सुप्रिया कोटलवार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
