
वाळूज महानगर, (ता.23) – भारत राष्ट्र समितीचे केशीआर यांचे विचार रुजवण्यासाठी व महाराष्ट्रात शेतकऱ्यांची राज्य आणण्यासाठी भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यांमध्ये एकाच वेळी 288 मतदारसंघांमध्ये पक्ष संघटन तसेच महानोंदणी अभियान बुधवारी (ता.24) मे पासून राबविण्यात येत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण गंगापूर खुलताबाद तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये भारत राष्ट्र समितीचे सर्व कार्यकर्ते भेटण्यासाठी येणार आहे. या दरम्यान प्रत्येक गावांमध्ये वेगवेगळ्या कमेट्यांची निवड त्याचबरोबर सदस्य नोंदणी अभियान सुद्धा राबविण्यात येणार आहे. या अभियानाची उद्या बुधवारी तारीख 24 रोजी गंगापूर तालुक्यातील जामगाव येथून सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे. असे आवाहन राष्ट्र समितीचे संतोष माने यांनी केले आहे.
