
वाळूजमहानगर (प्रतिनिधी) :- वाळुज येथील मनीषानगर येथे राहणारी 26 वर्षीय विवाहित महिला तिच्या दोन मुलींसह 3 जुलै रोजी रात्री 9 वाजे पूर्वी बेपत्ता झाली. त्यांचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र त्या अध्यापही मिळून आल्या नाहीत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज येथील मनीषानगरात राहणारा रमेश प्रकाश सुरडकर (वय 36) व्यवसाय ट्रक चालक हा पत्नी, तीन मुली व एक मुलगा यांच्यासह राहतो. त्यापैकी एक मुलगी व एक मुलगा असे पैठणखेडा येथील हॉस्टेलला आहे. 3 जुलै रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास सुरडकर हा घरी आला असता त्याची पत्नी मंदा रमेश सुरडकर व दोन मुली कावेरी (वय 12 वर्षे), आराध्या (वय वर्षे) या तिघी बेपत्ता असल्याचे समजले. त्यांचा आजुबाजुच्या परिसरात, नातेवाईकाकडे शोध घेतला. मात्र त्या मिळुन आल्या नाही. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून त्यांचा शोध पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुखदेव भागडे हे घेत आहे.
असे आहे वर्णन –
नाव मंदा रमेश सुरडकर (वय-26 वर्ष), रंगगोरा, केसकाळे, अंगात पिवळ्या रंगाची साडी व ब्लाऊज, पायात चप्पल, भाषा मराठी बोलते, सोबत मुलगी कावेरी रमेश सुरडकर (वय 12 वर्षे) आराध्या (परी) रमेश सुरडकर (वय 4 वर्षे) सर्व रा. मनिषानगर ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर.
