
वाळूज महानगर – मुलगा आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचे समजतात त्याच्या आई-वडिलांनी तात्काळ धाव घेत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने कोणाचेही न ऐकता डोंगरावरून उडी घेतली. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडीलाचाही तोल गेल्याने दोघांचाही अंत झाला.

डोळ्या देखत घडलेल्या या घटनेमुळे आईनेही उडी घेऊन आत्महत्या केली. ही अत्यंत हृदयद्रावक घटना वाळूज परिसरातील तिसगावच्या खवड्या डोंगरावर शुक्रवारी 21 ऑगस्ट रोजी घडली.
मुरलीधर दामोधर चांदगुडे, (वय 48 वर्ष), संगिता मुरलीधर चांदगुडे, (वय 42 वर्ष) व कुणाल मुरलीधर चांदगुडे, (वय 19 वर्ष) अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. हे तिघेही अक्षयवन सोसायटी समोर, झाल्टा फाटा, ता.जि. छत्रपती संभाजीनगर, मुळ गांव- कर्जत पिपळगांव ता. अंबड जि. जालना येथील रहिवासी होते. या घटनेचे कारण मात्र समजू शकले नाही.
