August 20, 2026

वाळूज महानगर – राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवीनगर, नागपूर व जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अंतर्गत पंचायत समिती (शिक्षण विभाग), गंगापूर द्वारा आयोजित तालुकास्तरीय
अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा- २०२६
बजाजनगर येथील शिवछत्रपती विद्यालय येथे मोठ्या उत्साहात झाला.

या कार्यक्रमास गटशिक्षाधिकारी, पंचायत समिती गंगापूर अरविंद कापसे तसेच विस्तार अधिकारी अनिल सकदेव, तालुका समन्वयक रामकिशन पांचाळ, विलास गायकवाड तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या भोसले व सहभागी शाळेचे शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलम व ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मुलांना आपल्या दृष्टिकोन वैज्ञानिक ठेवण्यास सांगितला. तसेच भविष्यात ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सारखे शास्त्रज्ञ होण्याचे ध्येय ठेवण्यास सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या भोसले यांनी मुलांना प्रयोगाच्या माध्यमातून शिकण्यास सांगितले. तालुका समन्वयक विलास गायकवाड यांनी मुलांना वक्तृत्व कसे असावे याबद्दल मार्गदर्शन केले. तालुका समन्वयक रामकिसन पांचाळ यांनी मुलांच्या सादरीकरणाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला परीक्षक म्हणून रवी दाभाडे, अमोल माई, वाघ मॅडम हे लाभले. या मेळाव्यात गंगापूर तालुक्यातील शाळांनी सहभाग नोंदविला. मुलांनी PPT, चार्टच्या माध्यमातून “भरतील ऊर्जा क्षेत्रे २०४७ : भवितव्य (संधी) आणि आव्हाने” या विषयी आपले विचार मांडले. यामध्ये पहिला क्रमांक – जि. प. प्रशाला तुर्काबाद खराडी यांचा आला. तर दुसरा क्रमांक न्यू. शहीद भगतसिंग रांजणगाव यांचा आला. तसेच सर्व सहभागी मुलांना प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका डोंगरे यांनी केले तर आभार पांचाळ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवछत्रपती विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *