July 8, 2026


वाळूज महानगर, (ता. 8) – घरात झोपलेल्या एका 40 वर्षीय महिलेजवळ जाऊन तिच्याशी संबंध ठेवण्याची मागणी केली. ही घटना मंगळवारी (ता.7) रोजी वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे घडली. यामुळे महिलांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रांजणगाव (शेणपुंजी) येथील 40 वर्षीय महिला मंगळवारी (ता. 7) रोजी घरी झोपलेली असताना आरोपी प्रकाश राम सोळंके रा. सावतानगर रांजणगाव (शेणपुंजी) याने तिच्याकडे संबंध ठेवण्याची मागणी केली. त्याला तीने नकार दिला असता प्रकाश सोळुंके याने तिला शिवीगाळ करुन हाताचापटणे मारहाण केली.
याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध कलम 74, 115(2), 352, 351(2) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील तपास वाळूज एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सय्यद करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *