
वाळूजमहानगर, वार्ताहर) – ऑनलाइन मागवलेल्या साडीच्या सहाय्याने एका 32 वर्षीय कामगाराने हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी 21 जानेवारी रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास सिडको वाळुज महानगरात उघडकीस आली. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण समजु शकले नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आनंद जनगसागर मंगल कार्यालय बजाजनगर येथे आई, वडील, पत्नी व मुलासह राहणारा आकाश भास्करराव डांगे हा वाळूज औद्योगिक वसाहतीतील जॉन्सन अॅण्ड जॉन्स कंपनीत कायस्वरूपी कामगार होता. तो मंगळवारी रात्री 7 वाजेच्या सुमारास सिडको वाळूजमहानगरातील हॉटेल रूद्राय बार रेस्टॉरन्ट अॅण्ड लॉज येथ गेला होता. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्याला अवस्थत वाटत असल्याने तेथेचे रूम बुक केली. आणि ऑनलाईन मागवलेल्या नव्या कोऱ्या साडीने गळफास घेतला. बुधवारी 21 जानेवारी रोजी सकाळी बराच वेळ झाला. तरी तो रूमच्या बाहेर आला नाही. म्हणून दुपारी एक वाजेच्या सुमारास हॉटेल मॅनेजर सिद्धांत अंगारे याने दुसऱ्या चावीने रूमचा दरवाजा उघडला असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. ही माहिती एमआयडीसी वाळूज पोलीसांनी मिळाल्याने पोउपनि. गोरखनाथ कडू, पोलीस अंमलदार राहुन मानकर, रमेश गोरकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत आकाश याला नातेवाईकांच्या मद्दतीने खाजगी रूग्णवाहकेतून घाटीत दाखल केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार काकासाहेब काकडे करीत आहे.

Bot88bet… I’m curious about the ‘bot’ part. Do they have automated betting? Time to investigate! Hope it’s helpful, not just hype. Check it out here: bot88bet