
वाळुज महानगर – तिसगाव अंतर्गत येणाऱ्या पारिजातनगर-म्हाडा कॉलनी येथील सिद्धिविनायक गणपती मंदिर प्रांगणात अखंड हरिनाम सप्ताहाला रविवारी 18 जानेवारी रोजी धार्मिक वातावरणात सुरुवात करण्यात आली.
प्रथम उद्योजक दत्तात्रय गावंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हभप उद्धव महाराज सानप यांच्या वाणीतून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वन अधिकारी अण्णासाहेब पेहरकर, ग्रा पं सदस्य नितीन जाधव, संजय जाधव, विष्णू जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या ध्वजारोहण प्रसंगी स्वप्ननील अडसूळ, गुलाबराव सोनवणे, संजय अनपट, प्रमोद परळकर, सोमनाथ संभेराव, बाळासाहेब तायडे, उद्धव सानप,बाळासाहेब केरे, सुनील चव्हाण, किसन पवार, बाबासाहेब राजपूत, कैलास घोलप, नारायण ठोंबरे, संध्या अनपट, वैशाली हिवाळे, कमल परळकर आदींची उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी हिवाळे यांनी केले.
या सप्ताहात दररोज काकडा भजन, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, हरि किर्तन व हरिजागर आदी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. तसेच पोलिस पाटील हभप उद्धव महाराज, हभप अभिमन्यू महाराज कदम, हभप गायत्री बाळासाहेब घायवट, हभप गणेश महाराज जगताप, हभप हरिशरण गिरी महाराज, हभप कैलास महाराज बारगळ, हभप ज्ञानदास डॉ विजयकुमार फड आदी किर्तनातून समाजप्रबोधन करणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा समारोप रविवारी 25 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान मायानगरी, श्रीरामपूर येथील स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन व भाविकांना महाप्रसाद वाटप कार्यक्रमाने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा वाळूज महानगर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

Yo, gameg88! This one’s actually pretty fun. I spent a little too much time on it, if you ask me. Check it out and see if you get hooked too: gameg88
9999jililogin… Sounds like a party! Give it a try and see if you win big. Log in at 9999jililogin