May 9, 2026

वाळूजमहानगर, (ता.9) – इप्का फाउंडेशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (राज्य कर्करोग संस्था) आणि गेंब्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत कर्करोग पूर्व तपासणी व कर्करोग जनजागृती शिबिरात शुक्रवारी (ता.8) रोजी इप्का फाउंडेशनकडून अत्याधुकीन तंत्रज्ञानाच्या साह्याने 18 महिलांची कर्करोग पूर्व तपासणी करण्यात आली.

पोलीस आयुक्तालय कार्यालय वडगाव (कोल्हाटी) – बजाजनगर येथे हे शिबीर घेरण्यात आले. यावेळी इप्काचे युनिट हेड संजय चौबे, डॉ. व्यंकट मैलापूरे, शासकीय कर्करोग रुग्णालय येथील महिला कर्करोग विभाग प्रमुख डॉ. अर्चना राठोड, औधोगिक सुरक्षा व आरोग्य मराठवाडा विभागाचे उप संचालक म.य. भालेकर, अलाईड ब्लेंडर्स डिस्टीलर्सचे राजेश पाटील व गेंब्स फाउंडेशनचे गणेश मते यांची प्रमुख उपस्थिती होती.

मानवी शरीर हे रोगाचे भांडार असून, न घाबरता व लाजता कार्करोग होण्याच्या आगोदर तपासून त्यावर योग्य तो उपचार घेऊन कर्करोग हा 100 % बरा करता येतो. इप्का फाउंडेशन सातत्याने अशाप्रकारचे अनेक उपक्रम/शिबीर राबवत आरोग्य जनजागृती करत असते. असे इप्का फाउंडेशनचे व्यंकट मैलापूरे यावेळी म्हणाले.

देशामध्ये सध्या प्रत्येक 29 महिला मागे 1 महिला कर्करोगाला बळी पडते. तसेच प्रत्येक 8 मिनिटाला एका गर्भाशय कर्करोग महिलेचा मृत्यू होतो. त्याचप्रमाणे ब्लड प्रेशर किंवा मधुमेह झालेल्या रुग्णाला आयुष्यभर गोळी घ्यावी लागते, परंतु कर्करोग होण्याच्या आगोदर योग्य ती तपासणी करून घेऊन कार्करोग पहिल्या स्टेजला डिटेक झाला तर तो बरा करता येतो. आणि जर दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजला डिटेक झाला. तर त्यावर वेळीच उपचार घेऊन त्या रुग्णाचे आयुष्य 25,30 वर्ष वाढवता येते. शासन कार्करोग रुग्णांच्या उपचारांसाठी अनेक मोफत योजना राबवत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय (राज्य कर्करोग संस्था) मध्ये मोफत उपचार घेऊ शकता. असे मार्गदर्शन डॉ. अर्चना राठोड यांनी यावेळी केले. या शिबिरात अद्यावत मोबाईल व्हॅन द्वारे 18 स्त्रियांची मोफत पॅप स्मेर व व्ही आय टेस्ट करण्यात आली. त्याचा तपासणी अहवाल 3 दिवसामध्ये दिला जाईल. या शिबिराच्या यशस्वितेसाठी इप्का लॅबचे एकनाथ पवार, प्रफुल्ल कांबळे, संतोष कोटकर, गेंब्स फाउंडेशनचे सचिन लिमकर व आशा स्वयं सेविका, कर्करोग रुग्णालयच्या परिचारिका आदींनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *