May 9, 2026


वाळूजमहानगर, (ता.9) – कंपनीमध्ये अकाउंटंटचे काम करीत असताना मालकाचा विश्वासघात करून कंपनीच्या मालकीचे 25 लाख 45 हजार 747 रुपये आरोपीने स्वतःच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केले. हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस येताच कंपनी मालकाने पोलिसात धाव घेत रविवारी (ता.8) रोजी फिर्याद दिली.

               याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक परिसरातील साजापूर परिसरात सुधांशू सुभाष शेवडे रा. छत्रपती संभाजीनगर (वय 60) यांची कॅलीब्रो मेजर इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नं. जी 39/7/2 येथे कंपनी आहे. या कंपनीमध्ये आरोपी मंगेश नंदकुमार पाटील रा. प्लॉट नंबर 183/ बी, छत्रपतीनगर वडगाव (कोल्हाटी) -बजाजनगर हा अकाउंटन्ट म्हणून नौकरी करत होता. त्याला सोपविण्यात आलेली आर्थिक जबाबदारी व अधिकार यांचा अप्रमाणिकपणे बेकायदेशीर रित्या स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी उपयोग करुन सुधांशू सुभाष शेवडे (वय 60) यांच्या कंपनीचे 25 लाख 45 हजार 747 (पंचविस लाख पंचेचाळीस हजार सातशे सत्तेचाळीस) रुपये स्वत:च्या बँक खात्यात ( 7646517282 कोटक महीद्रा बँक ) ट्रान्सफर करून विश्वासघाताने फसवणूक केली. याप्रकरणी सुधांशु शेवडे यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी मंगेश पाटील यांच्या विरुद्ध कलम 406, 408 भादंवि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *