July 26, 2026

वाळूजमहानगर – आषाढी एकादशी निमित्त भाविक विठुरायाच्या चरणी लीन होत असतानाच गोळीबार झाल्याची माहिती आपत्कालीन क्रमांकावर शनिवारी 25 जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मिळाली. या घटनेमुळे वाळुज एमआयडीसी पोलिसांची चांगलीच धांदल उडाली. मात्र ही माहिती खोटी व जाणीवपूर्वक दिल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी एका 30 वर्षीय आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी आदित्य हरीचंद्र हिवाळे, अंदाजे वय 30 वर्ष रा. लवकी वस्ती ता. गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर याने खोडसाळपणाने शनिवारी 25 जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजता पोलिसांना आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून लवकी वस्ती येथे गोळीबार झाल्याची खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केली. याप्रकरणी पोलिस अंमलदार दीपक विष्णू हिवाळे यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी आदित्य हरीचंद्र हिवाळे याच्या विरुद्ध कलम 212, 217 बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *