
वाळूजमहानगर (प्रतिनिधी) :- श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी सोहळ्या निमित्त नाभिक समाज मंडळ रांजणगाव (शेणपुंजी), तालुका गंगापूरच्या वतीने भागवताचार्य ह.भ. प. सायलीताई राऊत महाराज (श्री कल्याण स्वामी संस्थान चकलंबा, ता. गेवराई, जि. बीड) यांचे हरी मंगळवार 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता रावते मंगल कार्यालय, शिवनेरी कॉलनी येथे किर्तन होणार आहे.

श्री कल्याण स्वामी आश्रम, चकलांबा, तालुका गेवराई, जिल्हा बीड च्या संस्थापक ह. भ. प. साध्वी सोनाली दीदी कर्पे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, मिती श्रावण कृ.12 शके 1948, मंगळवार 8 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या हरी कीर्तनाचा लाभ रांजणगाव (शेणपुंजी) व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी व नाभिक समाज बांधवांनी घ्यावा असे आवाहन यावेळी नाभिक समाज मंडळाचे अध्यक्ष नितीन नाईक, उपाध्यक्ष दत्तात्रय पंडित, सदस्य संदीप शेजुळ, विक्रम शेजुळ, दिलीप पंडित, कैलास पंडित व नागेश कोंडामंगल यांनी केले आहे. या हरिकीर्तनास मृदंगाचार्य ह.भ.प. सचिन महाराज राऊत, गायनाचार्य ह. भ. प. स्नेहलताई तैनाक व ह.भ.प. तनुजाताई घुगे या गायन व संगीत साथ देणार आहेत.
