
वाळूज महानगर, (ता.6) – आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती व पत्रकार दिनानिमित्त वाळूज महानगर पत्रकार संघाच्या वतीने मंगळवार 6 जानेवारी रोजी दर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तोडोंळी (ता. पैठण) येथील ग्राम महसूल अधिकारी श्रीहरी कांबळे व पुणे महानगरपलिका अग्निशमन दलातील अधिकारी सोपान कांबळे यांची उपस्थिती होती. 
प्रथम मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

बजाजनगर येथील वाळूज महानगर पत्रकार संघाच्या जागेवर झालेल्या या कार्यक्रमास वाळूज महानगर पत्रकार संघाचे संस्थापक चंद्रशेखर कुरणे, अध्यक्ष अशोक कांबळे, श्यामसुंदर गायकवाड,
आर.के.भराड, शिवाजी बोडखे, संजय मगरे, संजय निकम, सुदाम गायकवाड, अशोक साठे, गजानन राऊत, अभिजित चौरे, अनिकेत घोडके, मंगेश कुमठे,
पांडुरंग चोथे, प्रकाश सातपुते, सुधीर खैरे, मनोज जाधव आदीसह अनेक पत्रकारांची उपस्थिती होती.

Alright mates, found this site called idlucksvip. Gave it a spin last night, and well.. You should try too! Worth a look, definitely. Visit them here idlucksvip.