वाळूजमहानगर, (ता.12) – बजाजनगर येथे सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित असलेल्या एमआयडीसीच्या भूखंडावर दुकान गाळे बांधून नियमांची धज्जी उडवणाऱ्यावर कारवाई करा. या मागणीसाठी गेल्या पाच वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र एमआयडीसीचे अधिकारी संबंधितांवर कोणतीही कार्यवाही करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे रिपाइंच्या वतीने अधिकाऱ्यांना 14 डिसेंबर रोजी घेराव घालणार असल्याचे सोमवारी (ता.12) रोजी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ, जिल्हा कार्याध्यक्ष शरद कीर्तिकर व जे के आमराव यांनी सांगितले.

एमआयडीसी अधिकारी वर्ग लबाड आहेत त्याना ईमेल्स पाठवले पाठ पुरवठा करून सुधा ऊपयोग नाही झाला एकच भूखंड दोन ग्रुपला वाटला वरून सांगतात की अता कोर्ट मधे जाने त्या च्या कडून न्या य घ्या आणि मग या एमआयडीसी अधिकारी कडे गरीब कामगारांची फसवणूक झाली आहे त्या मूळे पैसा गेला वेळ गेली आणि मानसिक तान ही आज ही घरापासून वंचित कामगार आहेत बंधू नो